जून २२
Appearance
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७३ वा किंवा लीप वर्षात १७४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]इ.स.पूर्व तिसरे शतक
[संपादन]- २१७ - ईजिप्तच्या टॉलेमी चौथ्याच्या सैन्याने ॲंटियोकस तिसऱ्याचा पराभव केला.
इ.स.पूर्व दुसरे शतक
[संपादन]- १६८ - लुसियस एमिलियस पॉलसच्या नेतृत्वाखाली रोमन सैन्याने मेसिडोनियाच्या पर्स्युसचा पराभव केला.
चौदावे शतक
[संपादन]- १३७७ - वयाच्या दहाव्या वर्षी दुसरा रिर्चड इंग्लंडचा राजा झाला.
सतरावे शतक
[संपादन]- १६३३ - पोपच्या दबावाखाली गॅलिलियोने कबूल केले की पृथ्वीच सूर्यमालेचा केन्द्रबिंदू आहे, सूर्य नव्हे.
अठरावे शतक
[संपादन]- १७५७ - पलाशीची लढाई. या लढाईत विजय मिळाल्याने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.
- १७७२ - एखाद्या गुलामाने इंग्लंडमध्ये प्रवेश केला, तर त्याला स्वतंत्र नागरिक समजण्यात येऊ लागले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१२ - नेपोलियन बोनापार्टने रशियावर चढाई केली.
- १८९३ - युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया ३५८ खलाशी व अधिकाऱ्यांसह बुडाली.
- १८९७ - चार्ल्स रँड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा प्रतिशोध म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.
- १८९८ - स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैनिक क्युबात उतरले.
विसावे शतक
[संपादन]- १९११ - जॉर्ज पाचवा तथा पंचम जॉर्ज इंग्लंडच्या राजेपदी.
- १९३७ - कॅमिल शॉटेम्प्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४० - सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - फ्रांसने जर्मनीसमोर हार पत्करून संधी केली.
- १९४१ - जर्मनीने रशियावर चढाई केली.
- १९६२ - एर फ्रांसचे बोईंग ७०७ जातीचे विमान वेस्ट ईंडीझमधील ग्वादालुपे बेटाजवळ कोसळले.
- १९६३ - पॉल सहावा पोपपदी.
- १९७६ - कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
- १९७८ - प्लुटोचा उपग्रह खारॉनचा शोध लागला.
- १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.
- १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला.
- १९८६ - मेक्सिकोच्या डियेगो माराडोनाने इंग्लंडविरुद्ध हँड ऑफ गॉड व गोल ऑफ द सेन्चुरी नावाने प्रख्यात झालेले गोल नोंदवून विजय मिळवला.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १७१३ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १८९६ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता.
- १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक.
मृत्यू
[संपादन]- १२७६ - पोप इनोसंट पाचवा.
- १४२९ - गियात अल काशी, पर्शियन अंतराळतज्ञ व गणितज्ञ.
- १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.
- २००१ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- फाशीवाद विरोधी आंदोलन दिन - क्रोएशिया.
- शिक्षक दिन - एल साल्वादोर.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जून २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)