Jump to content

काजोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काजोल
जन्म काजोल मुखर्जी
५ ऑगस्ट, १९७४ (1974-08-05) (वय: ५०)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९९२ - २००१, २००६ - २०१०
भाषा हिंदी भाषा
पुरस्कार पद्मश्री(२०११)
वडील शोमू मुखर्जी
आई तनुजा
पती
अपत्ये न्यासा, युग
नातेवाईक तनिशा, राणी मुखर्जी

काजोल देवगण (पूर्वीचे नाव: काजोल मुखर्जी, ५ ऑगस्ट १९७४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर ६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत (नूतनसोबत बरोबरी) ज्यांपैकी विक्रमी ५ पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत. २०११ साली भारत सरकारने काजोलला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

१९९२ सालच्या बेखुदी ह्या चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९३ साली शाहरूख खानसोबतचा बाजीगर हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर १९९५ साली आदित्य चोप्राने आपल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये काजोलला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या तुफान यशामुळे काजोल यशाच्या व कीर्तीच्या शिखरावर पोचली. ह्यानंतरच्या काळात करण जोहरने काजोल व शाहरूख खान जोडीसोबत अनेक यशस्वी चित्रपट काढले.

चित्रपट यादी

[संपादन]
वर्ष चित्रपट
१९९२ बेखुदी
१९९३ बाजीगर
१९९४ उधार की जिंदगी
१९९४ ये दिल्लगी
१९९५ करण अर्जुन
१९९५ ताकत
१९९५ हलचल
१९९५ गुंडाराज
१९९५ दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
१९९६ बम्बई का बाबू
१९९७ गुप्त: द हिडन ट्रुथ
१९९७ हमेशा
१९९७ मिन्सारा कनावू (तमिळ)
१९९७ इश्क
१९९८ प्यार किया तो डरना क्या
१९९८ डुप्लिकेट
१९९८ दुश्मन
१९९८ प्यार तो होना ही था
१९९८ कुछ कुछ होता है
१९९८ दिल क्या करें
१९९९ हम आपके दिल में रहते हैं
१९९९ होते होते प्यार हो गया
२००० राजू चाचा
२००१ कुछ खट्टी कुछ मीठी
२००१ कभी खुशी कभी गम
२००३ कल होना हो
२००६ फना
२००६ कभी अलविदाना कहना
२००७ ॐ शांति ॐ
२००८ यू मी और हम
२००८ हाल-ए-दिल
२००८ रब ने बना दी जोडी"
२००९ विघ्नहर्ता श्री सिद्धीविनायक
२०१० माय नेम इज खान
२०१० वी आर फॅमिली
२०१० तूनपूर का सुपर हीरो
२०१२ मक्खी
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत