तुमचे मेसेज ऑर्गनाइझ करा
तुमची संभाषणे ऑर्गनाइझ केलेली, फॉरमॅट केलेली आणि भाषांतरित ठेवा.
WhatsApp वर, संभाषणे व्यक्त करणारी, मजेदार व पूर्णपणे तुम्हाला हवी तशी असू शकतात. कोणत्याही डिव्हाइसवरील मेसेजिंग एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले आहे, त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता आणि तुमचे वैयक्तिक मेसेज खाजगी आणि सुरक्षित राहतात हे जाणून घेऊ शकता.

तुमची संभाषणे ऑर्गनाइझ केलेली, फॉरमॅट केलेली आणि भाषांतरित ठेवा.




ऑर्गनाइझ केलेले रहा आणि सर्व, न वाचलेले आणि ग्रुप चॅट यांसाठी असलेले फिल्टर वापरून तुमची सर्वात महत्त्वाची संभाषणे शोधा.
सर्वात महत्त्वाच्या गोष्टींच्या सुलभ ॲक्सेससाठी चॅटच्या सर्वात वरती कमाल 3 मेसेजना पिन करा.
सुलभ वाचनीयतेसाठी तुमच्या मेसेजमध्ये मजकूर फॉरमॅट करा - इटॅलिक्स, बोल्ड, बुलेट पॉइंट आणि बरेच काही.
तुम्ही वन-ऑन-वन किंवा ग्रुप चॅटमध्ये पाठवलेल्या किंवा तुम्हाला प्राप्त झालेल्या मेसेजचे थेट तुमच्या WhatsApp चॅटमध्ये भाषांतर करा.

कनेक्शन धीमे असले, तरीही रोजचे क्षण कॅप्चर करा आणि संपादित करा.

WhatsApp वर पूर्ण HD गुणवत्तेसह कोणताही व्हिडिओ किंवा फोटो पाठवा.

कॉम्प्रेस न करता 2GB इतक्या मोठ्या फाइल तुमच्या चॅटमध्ये विनामूल्य पाठवा.
शब्द अपुरे पडतात, तेव्हा स्वतःला व्यक्त करण्यासाठी WhatsApp च्या विविध फीचरचा आधार घ्या - स्टिकर, GIF, प्रतिक्रिया, व्हिडिओ आणि व्हॉइस नोट आणि आणखी बरेच काही.




शोधण्यायोग्य आणि सानुकूल करण्यायोग्य स्टिकर, अवतार व GIF वापरून सर्जनशीलतेला वाव द्या.
मेसेजवर प्रतिक्रिया देण्यासाठी कोणतेही इमोजी वापरा आणि तुमचे विचार सहजपणे व झटपट शेअर करा.
चॅटमध्ये सुमारे एक मिनिटाच्या लांबीचे व्हिडिओ मेसेज त्वरित रेकॉर्ड आणि शेअर करून त्या क्षणाचा अनुभव कॅप्चर करा.
टाइप करण्यासाठी जास्त मोठी असली, तरीही संपूर्ण स्टोरी सांगा. तुम्हाला प्राप्त झालेल्या व्हॉइस नोट वाचायच्या असल्यास ट्रान्स्क्रिप्ट वापरा किंवा अधिक जलद ऐकण्यासाठी त्यांचा वेग 1.5 किंवा 2x ने वाढवा.

अधिक मोठ्या स्क्रीनवर चॅट करा आणि कॉल करा, तुमचे स्टेटस शेअर करा आणि आणखी बरेच काही करा.

तुमचा फोन बंद असतानाही, तुमच्या काँप्युटरवरून चॅट किंवा कॉल करण्यासाठी WhatsApp वेब किंवा आमची डेस्कटॉप ॲप वापरा.

एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्यास सूचित केले जाण्यासाठी तुमच्या Apple Watch वर येणारे मेसेज पहा.

Ray-Ban Stories, Ray-Ban Meta, Oakley Meta आणि Meta Ray-Ban Display स्मार्ट ग्लासेस तुम्हाला WhatsApp हँड्स-फ्री वापरू देतात.

एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्यास सूचित केले जाण्यासाठी तुमच्या Garmin वॉचवर येणारे मेसेज पहा.
लिस्ट म्हणजे कस्टमाइझ करता येणारे फिल्टर, जे तुम्हाला तुमची चॅट ऑर्गनाइझ केलेली ठेवण्यात मदत करू शकतात. तुमच्याकडे चार डीफॉल्ट लिस्ट असतात:
तुम्ही मेसेजवर दाबून धरून ठेवून आणि 'पिन करा' निवडून चॅटच्या सर्वात वरती कमान तीन मेसेज पिन करू शकता. मेसेज पिन केल्यानंतर, तो २४ तास, ७ दिवस किंवा ३० दिवस चॅटच्या सर्वात वरती बॅनरच्या स्वरूपात दिसतो. चॅटमधील मेसेजवर जाण्यासाठी पिन केलेल्या मेसेजच्या बॅनरवर टॅप करा.
WhatsApp तुम्हाला तुमच्या मेसेजमध्ये बोल्ड करणे, इटॅलिक करणे आणि यासारखे आणखी फॉरमॅटिंग पर्याय वापरून मजकूर फॉरमॅट करण्याची अनुमती देते.
तुम्ही तुमच्या चॅटमध्ये पाठवलेल्या किंवा प्राप्त केलेल्या मेसेजचे भाषांतर उपलब्ध भाषांमध्ये करू शकता. लोकेशन, दस्तऐवज, संपर्क, स्टिकर आणि GIF यांचे भाषांतर केले जाऊ शकत नाही. भाषांतर करण्यासाठी तुम्हाला सशक्त वायफाय सिग्नल किंवा मोबाइल डेटा आणि पुरेशा स्टोरेजची आवश्यकता असेल.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा. फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी, कॅमेरावर टॅप करा. विद्यमान फोटो किंवा व्हिडिओ अटॅच करण्यासाठी, ‘अटॅच करा’ (पेपर क्लिप) दाबा आणि धरून ठेवा, त्यानंतर शेअर करण्याकरिता फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
तुम्ही WhatsApp वर कॉम्प्रेशनशिवाय, मोठ्या फाइल विनामूल्य पाठवू शकता. दस्तऐवजांसाठी, फाइलचा कमाल आकार २ GB इतका असावा.
WhatsApp वरील व्हिडिओ नोटमुळे तुम्हाला थेट चॅटमध्ये कमाल ६० सेकंदांच्या व्हिडिओ नोट त्वरित रेकॉर्ड आणि शेअर करता येतात. प्राप्तकर्त्याद्वारे व्हिडिओ नोट डाउनलोड केल्या जाऊ शकत नाहीत.
WhatsApp चे व्हॉइस मेसेजिंग वापरून तुम्ही तुमच्या संपर्कांशी किंवा ग्रुपमध्ये त्वरित संवाद साधू शकता. तुम्ही महत्त्वाची आणि वेळेच्या दृष्टीने संवेदनशील अशी माहिती पोहोचवण्यासाठी व्हॉइस मेसेज वापरू शकता.
तुम्ही वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये स्टिकर ॲक्सेस करू शकता. स्टिकर पाहण्यासाठी आणि वापरण्यासाठी, चॅट उघडा, त्यानंतर स्टिकर आयकॉनवर टॅप करा. तुम्ही त्यावर टॅप करताच ते पाठवले जाईल. WhatsApp स्टिकर स्टोअरमधील सुचवलेली स्टिकर पॅक कोणत्याही डाउनलोड केलेल्या पॅकच्या खाली दाखवली जातात. तुम्ही यांपैकी कोणतीही स्टिकर पाठवण्यासाठी त्यांवर टॅप करू शकता किंवा संपूर्ण पॅक पाहण्यासाठी स्टिकर पॅक जोडा यावर टॅप करू शकता.
तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमधील मेसेजवर इमोजी वापरून प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही मेसेजच्या खाली असलेल्या इमोजीवर टॅप करून मेसेजवरील सर्व प्रतिक्रिया पाहू शकता. एखाद्या मेसेजवर प्रतिक्रिया देण्यासाठी, तुम्ही मेसेजवर टॅप करून धरून ठेवा आणि त्यांनतर इमोजीवर टॅप करा.
तुमच्या फोनवर पाठवलेले ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटो WhatsApp आपोआप सेव्ह करते. मीडिया दृश्यमानता हा पर्याय डीफॉल्टनुसार चालू केलेला असतो. WhatsApp ला तुमच्या डिव्हाइसच्या स्थानिक स्टोरेजवर आपोआप मीडिया सेव्ह करण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही अधिक पर्याय (तीन अनुलंब बिंदू) > सेटिंग्ज > चॅट यावर टॅप करू शकता.
WhatsApp योग्यरीत्या काम करत असल्याची खात्री करण्यासाठी, तुमच्या फोनमध्ये स्टोरेज जागा उपलब्ध आहे याची खात्री करा. तुम्ही स्टोअर केलेल्या मीडिया फाइल किंवा चॅट हटवून अथवा WhatsApp च्या बाहेर तुमच्या फोनवरील स्टोरेज मोकळे करून स्टोरेज जागा मोकळी करू शकता.






